September 16, 2024 7:47 PM September 16, 2024 7:47 PM

views 9

मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं (भास्कर) अनावरण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं भास्कर अर्थात भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचं अनावरण केलं. स्टार्ट अप्स, गुंतवणूकदार, सेवा प्रदाते आणि नियंत्रक यांच्यात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठई भास्कर उपयोगी पडणार आहे. स्टार्टअप उद्योगामध्ये भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं आवाहन पियूष गोयल यांनी यावेळी केलं. हे ऑनलाईन व्यासपीठ या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी प्रेरणा ठरेल असंही ते म्हणाले. 

September 12, 2024 1:42 PM September 12, 2024 1:42 PM

views 7

ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं. आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारांशी संबंधित असलेली सर्व माहिती या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून उद्योजकांना दिली आहे. ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती विविध मंत्रालये, संस्था आणि संस्थांच्या सहकार्यानं केली असून त्यात काही महत्त्वाची आकडे...

September 11, 2024 7:36 PM September 11, 2024 7:36 PM

views 8

ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या  ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं.  आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारांशी संबंधित असलेली सर्व माहिती या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून उद्योजकांना दिली आहे. ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती विविध मंत्रालये, संस्था आणि संस्थांच्या सहकार्यानं केली असून त्यात काही महत्त्वाची आकड...

September 10, 2024 10:24 AM September 10, 2024 10:24 AM

views 12

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याच लक्ष्य भारत २०३० पर्यंत गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं एसीएमए -अर्थात वाहनांच्या सुट्या भागांच्या कारखानदार संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या ध्येयाशी सरकार, कटीबद्ध असून सामुहिक प्रयत्नांनी देशाची आर्थिक वाढ चालूच राहिल, असं ते म्हणाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसादही यावेळी उपस...

August 31, 2024 12:32 PM August 31, 2024 12:32 PM

views 13

फिनटेक क्षेत्राने नैतिकता वापरुन पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरिता प्रयत्न करावेत – मंत्री पियुष गोयल

फिनटेक क्षेत्राने नैतिकता वापरुन पैशांचा गैरव्यवहार आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा कसा उपयोग करता येईल याकरिता प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी फिनटेक क्षेत्राला केलं आहे.मुंबईत आयोजित फिनटेक महोत्सव 2024 ला संबोधित करताना ते बोलत होते. देशातील फिनटेक क्षेत्राने भारताला गौरव मिळवून दिला आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी बोलताना काढले.

August 26, 2024 9:27 AM August 26, 2024 9:27 AM

views 15

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सिंगापूर दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सिंगापूरमध्ये विविध जागतिक व्यावसायिक नेत्यांशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की, भारतातील गुंतवणुकीच्या संधी शोधणं, देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ मिळवत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणं या मुद्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या चर्चांमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रास...

August 23, 2024 3:35 PM August 23, 2024 3:35 PM

views 8

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण

एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण केलं. राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. तुलसी आणि विहार या तलावांची माहिती घेऊन मुंबईतल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाय करण्याबाबतही गोयल यांनी सविस्तर चर्चा केली. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’ ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभ...

August 22, 2024 7:11 PM August 22, 2024 7:11 PM

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी उत्तर मुंबईतल्या दौराची सुरुवात चिंचोली इथल्या शताब्दी महानगरपालिका शाळेला भेट देऊन तिथल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला.  त्यानंतर गोयल  यांनी मालाड इथल्या काम सुरु असलेल्या मीठ चोकी उड्डाणपूलाची पाहणी केली. या पुलाचं काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मालाड इथं निर्माण...

August 21, 2024 8:26 PM August 21, 2024 8:26 PM

भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांशा यात खूप साम्य – मंत्री पीयूष गोयल

भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांशा यात खूप साम्य असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या CII भारत आफ्रिका व्यापारी परिषदेत ते बोलत होते. भारत आणि आफ्रिका हे दोन्ही देश त्यांच्या नागरिकांना चांगले जीवमान देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अधिक गुंतवणूक व्हावी आणि आर्थिक  परिस्थिती मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांत अधिकाधिक गुंतवणूक होण्याची गरज असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं.

August 20, 2024 1:21 PM August 20, 2024 1:21 PM

views 11

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, डिजिटल अर्थव्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश परस्परांना सहकार्य करू शकतात असं गोयल यांनी म्हटलं आहे. तेल आणि वायू उद्योगात भारत प्रगती करत असून मलेशियन कंपन्यांना यात अनेक...