October 13, 2025 3:38 PM October 13, 2025 3:38 PM
11
पीएम गतिशक्ती योजनेमुळे नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाली- पियुष गोयल
पीएम गतिशक्ती योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या योजनेला ४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते असं ते म्हणाले. गेल्या ४ वर्षात पीएम गतीशक्ती विविध क्षेत्रात पोहोचली असल्याचं गोयल म्हणाले. यावेळी पीएम गतिशक्ती च्या ४ नवीन उपक्रमांचं उद्घाटन गोयल यांनी केलं.