August 4, 2025 12:51 PM
10
समाज माध्यमावरच्या आशयांना बळी पडू नये, पत्र सूचना कार्यालयाचं आवाहन
भारत आणि अमेरिकेदरम्यान अलिकडेच झालेल्या करविषयक घडामोडींबाबत अफवा पसरवणाऱ्या किंवा खोटे दावे करणाऱ्या समाज माध्यमावरच्या आशयांना बळी पडू नये, असं आवाहन पत्र सूचना कार्यालयाने केलं आहे. कार्यालयाच्या सत्यता पडताळणी विभागाने असे आशय निर्माण अथवा सामायिक करणाऱ्यांवर कठोर टीका केली आहे. असा कोणताही आशय आपल्याकडे सामायिक करण्यापूर्वी किंवा त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून पडताळणी करून घेण्याचं आवाहनही विभागाने वापरकर्त्यांना केलं आहे.