November 10, 2025 12:24 PM November 10, 2025 12:24 PM

views 23

फिलीपिन्सिमध्ये फंग-वॉन्ग वादळाचं थैमान!

फिलीपिन्सला फंग-वॉन्ग वादळानं धडक दिली असून, साधारण ९ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उवान नावाचं हे शक्तिशाली टायफून ताशी १८५ ते २३० किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकलं. पूर्व फिलिपिन्समध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस होत असून सोसाट्याचे  वारे वाहात असल्याची माहिती स्थानिक हवामान अधिकाऱ्यांनी दिली आहे.

November 9, 2025 1:08 PM November 9, 2025 1:08 PM

views 23

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग चक्रीवादळाचा जोर तीव्र

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग या चक्रीवादळानं तीव्र स्वरूप घेतलं असून, त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस, विनाशकारी वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या मोठ्या भागात वादळाचा इशारा देण्यात आला आला असून, पूर्व आणि उत्तरेकडच्या भागातल्या १ लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं  आहे. फिलिपिन्समध्ये ३०० पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती  नागरी हवाई वाहतूक नियामक संस्थेनं दिली. 

November 5, 2025 12:46 PM November 5, 2025 12:46 PM

views 20

फिलिपीन्समध्ये काल्मेगी चक्रीवादळामुळे किमान ६६ जण ठार

 फिलिपीन्समध्ये काल्मेगी या चक्रीवादळामुळे आतापर्यंत किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. काल किनाऱ्याला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली असली, तरी अद्याप ताशी  १३० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. हे चक्रीवादळ पुढे व्हिएतनामच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे.

September 22, 2025 1:23 PM September 22, 2025 1:23 PM

views 15

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी घेतली फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

अमेरिकेत न्यूयॉर्क इथं होणाऱ्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ऐंशीव्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज फिलिपिनच्या परराष्ट्र मंत्री थेरेसा लाझारो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. फिलिपिनचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांनी अलिकडेच भारताचा दौरा केला होता. या भेटीत राजकीय, संरक्षण तसंच सागरी क्षेत्रात सक्रिय सहकार्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी आपल्या धोरणात्मक भागीदारासाठी वचनबद्ध...

August 3, 2025 7:31 PM August 3, 2025 7:31 PM

views 2

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांद आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीत उद्या दुपारी त्यांचं आगमन होईल. त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि कॅबिनेट मंत्र्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मार्कोस यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. तसंच राष्ट्राध्यक्ष मार्कोस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. फिलीपिन्सला परतण्याआधी मार्कोस बंगळुरूला भेट देणार आहेत. 

March 11, 2025 6:44 PM March 11, 2025 6:44 PM

views 17

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे यांना मनिला विमानतळावर अटक

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वॉरंट अंतर्गत आज मनिला विमानतळावर अटक करण्यात आली. दक्षिण फिलिपिन्समधल्या दावाओ शहराचे महापौर आणि नंतर राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या आदेशावरून झालेल्या नरसंहाराच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. जागतिक न्यायालयाने अशा प्रकारे अटक केलेले ते पहिले माजी आशियाई नेते आहेत. फिलिपिन्स पोलिसांच्या अंदाजानुसार सहा हजाराहून जास्त आणि मानवाधिकार  गटांच्या अंदाजानुसार ३० हजाराहून जास्त नागरिकांच्य...

December 10, 2024 7:04 PM December 10, 2024 7:04 PM

views 13

फिलीपिन्समधे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर

फिलीपिन्समधल्या  नेग्रोस बेटावरच्या  माउंट कानलाओन या ज्वालामुखीचा  उद्रेक झाल्या असून या भागातून  सुमारे ८७ हजार  लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संभाव्य उद्रेकांचा  धोका असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीची राख विस्तृत क्षेत्रावर पडल्यानं तिथली  दृश्यमानता कमी झाली असून  आरोग्याला  धोका निर्माण झाला आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील  उड्डाणं रद्द  करण्यात आली आहेत किंवा मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती फिलिपिन्सच्या  नागरी संरक...

July 11, 2024 8:42 PM July 11, 2024 8:42 PM

views 18

फिलिपाइन्समधील सुलतान कुदारात प्रांतात ७.० तीव्रतेचा भूकंप

दक्षिण फिलिपिन्सच्या सुलतान कुदरत प्रांतांत आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का  बसला, अशी माहिती फिलिपिन्सच्या भूकंपमापन आणि ज्वालामुखी शास्त्र  संस्थेनं दिली आहे. फिलिपिन्सच्या किनारी भागापासून नैऋत्येला १३३ किलोमीटरवर आणि  भूगर्भाखाली ७२२ किलोमीटरच्या आसपास भूकंपाचं केंद्र  होतं. प्रशांत महासागराभोवतालच्या भूकंपप्रवण क्षेत्रात हा भाग येत असल्यानं इथं वारंवार भूकंपाचे धक्के बसतात, मात्र यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा त्सुनामी येण्याची शक्यता नाही, अशी माहि...