July 18, 2025 11:03 AM July 18, 2025 11:03 AM
5
रशियावरील संभाव्य निर्बंधांमुळे खनिज तेलाच्या पुरवठ्याची भारताला चिंता नाही- हरदीपसिंग पुरी
बाजारात तेलाचा पुरेसा पुरवठा होत असल्यानं रशियाच्या खनिज तेलावरील निर्बंध हा भारतासाठी चिंतेचा विषय नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ऊर्जा वार्ता 2025 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. जगभरात जिथे सर्वात स्वस्त दरात खनिज तेल उपलब्ध होईल तिथून भारत तेलाची आयात करेल. नव भारतात असं सरकार आहे जे कोणत्याही दबावानुसार नाही तर परिणाम लक्षात घेऊन काम करतं, असंही ते म्हणाले. भारत यापूर्वी 27 देशांमधून खनिज तेलाच्या खरेदी करत होता आता ही संख्या जवळपा...