October 5, 2024 7:34 PM October 5, 2024 7:34 PM

views 4

पेसा निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्याचे राज्य सरकारचे आदेश

पेसा अर्थात अनुसूचित क्षेत्रातल्या १७ संवर्गांमध्ये निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारनं आज दिलं. शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहायक, आरोग्य सेवक अशा सुमारे ७ हजार पदांवर ही नियुक्ती होणार आहे. पहिल्या पगाराइतकं मानधन या उमेदवारांना दिलं जाईल. ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं भरती प्रक्रिया थांबवली होती.