August 5, 2024 3:33 PM

views 17

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८४ नुसार भविष्य निर्वाह निधीसह सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आली.