February 20, 2025 9:01 PM February 20, 2025 9:01 PM
14
GPF खात्यातली शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाईन !
राज्य सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना जीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खात्यातली शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रधान महालेखापाल जया भगत यांनी दिली.