August 13, 2024 4:50 PM August 13, 2024 4:50 PM

views 11

पतंजलीवरील अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायलयाकडून बंद

योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्या विरुद्धचा अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायलयाने बंद केला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजली उद्योगाने न्यायलयात दाखल केलेला माफीनामा आणि वृत्तपत्रांमार्फत प्रसिद्ध केलेली जाहीर माफी याचना न्यायालयाने स्वीकारली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती एहसानउद्दीन अमानुल्ला यांच्या पीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती. यापुढे कायद्याचं उल्लंघन करु नये आणि न्यायलयात दिलेल्या वचनपत्राचं पालन करावं...