November 7, 2025 2:57 PM November 7, 2025 2:57 PM
26
आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं निधन
पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँण्ड अस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं काल बीजिंग इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. एका परिषदेसाठी चीनला गेले असताना त्यांची तब्येत खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नरेश दधिच यांचा जन्म राजस्थानात चुरू जिल्ह्यातल्या छोट्या गावात झाला. बिट्स पिलानी, पुणे विद्यापीठ इथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या गणित विभा...