August 26, 2024 7:28 PM

views 11

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबादमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी अकरा वाजता नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरपंच, विधानपरिषद, विधानसभेचे सदस्य ते लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. याशिवाय शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्व...

July 29, 2024 3:23 PM

views 14

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन

शल्यविशारद, बालरोगतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. त्या पंचाऐशी वर्षांच्या होत्या. गर्भसंस्कार, नवजात शिशू तसंच माता यांच्या आहारासंदर्भात त्यांनी महत्वपूर्ण काम केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून १९९५ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. कुलगुरुपदाच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या आईचं नावही नमूद करण्यासारखे महत्वाचे निर्णय घेतले.

June 30, 2024 6:33 PM

views 16

ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं हृदयविकारानं निधन

नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. निवृत्तीनंतर त्यांनी ब्लॉगद्वारे वेगवेगळ्या प्रश्नावर मतं मांडली. वेगवेगळ्या वृत्तपत्रातूनही ते स्तंभलेखन करत होते. कमलाकर जोशी यांच्या निधनानं एक अभ्यासू पत्रकार गमावला, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं आहे.