September 16, 2025 8:55 PM September 16, 2025 8:55 PM

views 33

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं आज पश्चिम अमेरिकेतल्या युटा इथल्या त्यांच्या घरी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.    ‘Butch Cassidy and the Sundance Kid’, ‘The Sting’ आणि ‘All the President’s Men’ या क्लासिक चित्रपटांमध्ये रेडफोर्ड यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. १९८० साली ‘Ordinary People’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम दिग्दर्शनासाठीचा ऑस्कर पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर २००२ मध्ये  ऑस्कर अकादमीकडून मानद जीवनगौरव पुरस्कारानं ...

January 27, 2025 12:41 PM January 27, 2025 12:41 PM

views 1

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं निधन

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव आज रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं. १९७७ पासून २००६ पर्यंत ते आकाशवाणीच्या सेवेत होते.  रंगभूमीवर त्यांचं योगदान होतं. तसंच कीर्तनकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. 

January 23, 2025 7:38 PM January 23, 2025 7:38 PM

views 17

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं निधन

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शहरातल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनार यांची २१ नाटकं, तीन कादंबऱ्या, सहा काव्य संग्रह, ३८ एकांकिका, एक आस्वादक समीक्षापर लेख संग्रह, एक विनोदी लेख संग्रह, पाच बालकथा संग्रह, दोन एकांकिका, एक हिंदी नाटक, दोन कथा संग्रह इतकं साहित्य प्रकाशित आहे. 

January 1, 2025 3:51 PM January 1, 2025 3:51 PM

views 16

किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन

नांदेड जिल्ह्यातले किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं आज हैदराबाद इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदार संघात विजय मिळवला होता. त्यांच्या पार्थिवावर उद्या किनवट इथल्या दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाईक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

December 20, 2024 8:00 PM December 20, 2024 8:00 PM

views 4

दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचं निधन

नाशिकच्या दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचं आज अल्प आजारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाशिक जिल्हा सहकारी बँक, सिन्नर व्यापारी बँक, कुसूमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांमधे त्यांनी पदं भूषवली असून या संस्था वाढवण्यात त्यांचा मेालाचा सहभाग होता.   अखिल भारतीय लघु उद्योग महासंघाचे ते माजी अध्यक्ष होते. आज संध्याकाळी सातपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्य...

December 20, 2024 3:05 PM December 20, 2024 3:05 PM

views 15

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचं निधन

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तसंच भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश चौटाला यांचं आज दुपारी गुरुग्राम इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. ५ वेळा हरियाणाचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले ओम प्रकाश चौटाला माजी उप प्रधानमंत्री देवीलाल चौटाला यांचे सुपुत्र होते. हृदय विकाराचा झटका बसल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

December 16, 2024 3:37 PM December 16, 2024 3:37 PM

views 8

गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं निधन

संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे पुत्र, गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.

December 6, 2024 8:16 PM December 6, 2024 8:16 PM

views 10

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या महिन्यापासून मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. नाशिक इथं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पिचड यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश...

November 14, 2024 3:57 PM November 14, 2024 3:57 PM

views 36

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचं आज सकाळी नाशिक इथे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. पेठ-सुरगाणा या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उतरलेले चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आधी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते खासदार झाले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरही ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जिल्हा परिषदेतली विविध पदंही भूषवली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता सुरगाणा...

October 6, 2024 7:41 PM October 6, 2024 7:41 PM

views 9

मराठी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री वासंती घोरपडे-पटेल यांचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीतली पहिली बाल अभिनेत्री आणि पहिली बालगायिका वासंती घोरपडे-पटेल यांचं आज हैदराबाद इथं वार्धक्यानं निधन झालं. त्या १०१ वर्षांच्या होत्या.   १९३५ मधे प्रभात कंपनीच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘कुंकू’ चित्रपटात नायिका शांता आपटे यांच्या सोबत ‘भारती सृष्टीत सौंदर्य खेळे’ तसंच ‘अहा भारत विराजे’ ही त्यांनी गायलेली आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांची दाद मिळवून गेली. ‘अमरज्योती’, ‘संत तुलसीदास’, ‘अछूत’, ‘दिवाली’, ‘मुसाफिर’, ‘...