October 11, 2025 6:55 PM October 11, 2025 6:55 PM

views 40

बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग-पाशा पटेल

बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग आहे असं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा योजनेच्या सहाय्याने सुरू असलेल्या बांबू लागवड उपक्रमाच्या आढावा बैठकीत बोलत होते. बांबू लागवडीतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मिती आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन निर्माण होईल असं ते म्हणाले. बांबू मातीची धूप रोखतो, भूजलस्तर टिकवतो आणि कार्बन शोषणाद्वारे हवामानातील बदल कमी करण्यास मदत करतो असंही पटेल यांनी सांगितलं.

January 5, 2025 6:55 PM January 5, 2025 6:55 PM

views 13

ADB बँकेमार्फत दहा हेक्टरपर्यंत बांबू लागवडीसाठी अनुदानाची योजना

राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशासोबत बांबू बायोमासचा वापर करण्याचा निर्णय झाला असून शेतकरी उत्पादक कंपन्यांबरोबर त्यासाठी ५० वर्षांचा खरेदी करार करण्यात येईल असं   NTPC चे अध्यक्ष गुरदीप सिंह यांनी सांगितलं. NTPC च्या सोलापूर प्रकल्पात दरवर्षी  ४० लाख टन कोळसा  लागतो. त्यात १०% बांबू बायोमास मिसळलं तर चार लाख टन बायोमासची गरज असणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी बांबूलागवडीला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. सोलापूर इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित व...