February 9, 2025 1:02 PM February 9, 2025 1:02 PM

views 11

यमुना नदीकाठाचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल – परवेश वर्मा

यमुना नदीकाठाचा विकास करण्याला आपल्या पक्षाचं प्राधान्य असेल, असं आश्वासन भाजपचे नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार परवेश वर्मा यांनी आज दिलं.   दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर परवेश वर्मा यांनी मुंडका या मूळ गावी जाऊन त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांना आदरांजली वाहिली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दिल्लीतल्या ग्रामीण भागाकडे राज्य सरकारनं प्रचंड दुर्लक्ष केल्याचा आरोपही वर्मा यांनी केला.