September 20, 2025 11:59 AM September 20, 2025 11:59 AM

views 36

‘पॅलेस्टिनी राज्याचा सहभाग’ ठरावाला भारताचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या आगामी उच्चस्तरीय अधिवेशनादरम्यान पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांना दुरस्थ माध्यमातून संबोधित करण्याची परवानगी देण्याचा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केलं. अमेरिकेने पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनाप्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून रोखण्यासाठी व्हिसा नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर हा ठराव मंजूर करण्यात आला. 'पॅलेस्टिनी राज्याचा सहभाग' या शीर्षकाचा ठराव मंजूर करण्यासाठी 193 सदस्यीय महासभेने 145 मतांनी ठरावाच्या बाजूने, पाच सदस्यांनी विरोधात तर सहा जण गै...