April 29, 2025 2:32 PM April 29, 2025 2:32 PM

परशुराम जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन

परशुराम जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान परशुराम यांचे आशीर्वाद प्रत्येकाचं जीवन धैर्य आणि शक्तीने भरतील अशी अपेक्षा, मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केली.