December 13, 2024 12:48 PM December 13, 2024 12:48 PM
5
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २३ वर्ष पूर्ण, शहिदांना देशभरातून आदरांजली
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २३ वर्ष पूर्ण होत आहेत. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात घुसून गोळीबार केला होता. संसदेचं रक्षण करताना वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि प्राण गमावलेल्यांना आज देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या शूरांना श्रद्धांजली वाहिली आहे. हुतात्मा झालेल्या सुरक्षा रक्षकांचं साहस आणि निःस्वार्थ...