June 28, 2024 1:42 PM June 28, 2024 1:42 PM

views 7

वैद्यकीय प्रवेश परीक्षा – नीट मधल्या गैरप्रकारांविषयी लोकसभेत विरोधी पक्षसदस्यांचा गदारोळ

वैद्यकीय प्रवेश परीक्षा - नीट मधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्षसदस्यांनी गदारोळ केल्यामुळे, आज लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती. मात्र लोकसभेत आजच्या दिवसाचं कामकाज सुरु होताच वैद्यकीय प्रवेश परीक्षा-नीट प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी ती अमान्य केल्यानं विरोधकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे स...