November 30, 2025 2:09 PM November 30, 2025 2:09 PM
18
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधी पक्षांना आवाहन
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या अधिवेशनात मतदार पुनरिक्षण, दिल्ली बाँम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे. अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणली जाणार आहेत, या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू तसंच राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडली. जयराम रमेश, गौरव गोगोई, प्रमोद तिवा...