November 25, 2024 8:03 PM

views 22

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरुन गदारोळ

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    लोकसभेत सुरुवातीला वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित लाचखोरी प्रकरणाबरोबरच, उत्तर प्रदेशातल्या संभल इथल्या हिंसाचार प्रकरणावरून गदारोळ केल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहा...

November 24, 2024 1:36 PM

views 30

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही संभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज उद्यापासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. या अधिवेशनादरम्यान २६ नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला...

November 19, 2024 12:39 PM

views 20

यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने येत्या २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यन लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांकडून पाठिंबा मागणार आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

July 25, 2024 8:11 PM

views 19

यंदाच्या अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा

लोकसभेत आज सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे सदस्य चरणजीत सिंग चन्नी यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे आजोबा यांच्या हत्येचा उल्लेख केला. यावरून बिट्टू आणि चन्नी यांच्यात जोरदार वाद सुरु झाला. या गोंधळात पीठासीन अधिकाऱ्यांनी सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, या मुद्द्यावर चर्चा स...

July 21, 2024 11:18 AM

views 32

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रात आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत करण्यात येणार आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी 23 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.  

July 19, 2024 1:44 PM

views 36

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लोकसभा सचिवालयानं काल या आगामी विधेयकांची सूची जाहीर केली.     येत्या २२ जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सु...

June 24, 2024 1:32 PM

views 49

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला. काँग्रेस, नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आले होते.