December 15, 2025 12:42 PM
6
लोकसभेचं काजकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने माफी मागण्याची मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसच्या काल दिल्ली इथं झालेल्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आणि लाजीरवाणं आहे असं र...