December 12, 2025 8:42 PM

views 32

आगामी जनगणनेसाठी सुमारे पावणे १२ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२७च्या जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात केली जाणार असून ही जनगणना मालिकेतली १६वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल. यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली. ही जनगणना डिजिटल असेल असं वैष्णव म्हणाले. या प्रक्रियेत ३० लाख क्षेत्रीय अधिकारी सहभागी होतील. या प्रक्रियेत प्रत्येक घराला भेट देणं, घरांची यादी आणि गृहनिर्माण जनग...

December 11, 2025 3:51 PM

views 16

शेतमाल आणि कापसाला वाजवी हमीभाव या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ

शेतमाल आणि कापसाला वाजवी हमीभाव या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांनी आज प्रचंड गदारोळ केला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे, विरोधकांनी हौद्यात उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या.   या मुद्द्यावर अध्यक्षांनी आपल्या दालनात दुपारी बैठक बोलावली, मात्र सरकारने सभागृहातच उत्तर द्यावं असा आग्रह विरोधकांनी धरला. निषेधाच्या घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.

December 10, 2025 8:33 PM

views 18

राज्य घटनेतून मिळालेल्या जबाबदारीतूनच मतदार याद्यांचं पुनरीक्षण सुरू – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

राज्य घटनेनं सोपवलेल्या जबाबदारीतूनच निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम हाती घेतलं आहे. मतदार यादी शुद्ध करण्याची ही प्रक्रीया आहे अस प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलं. सरकारची आणि निवडणूक आयोगाची बदनामी करण्यासाठी विरोधक आरोप करत असल्याचं ते म्हणाले. निवडणूक सुधारणांवरुन सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ते लोकसभेत बोलत होते. देशात १९५२ मध्ये पहिल्यांदा ही प्रक्रीया राबवली गेली.२००४ पर्यंत कुठल्याही पक्षानं या प्रक्रियेला विरोध केला नाही, असं ते यावेळी म्हणाले...

December 7, 2025 2:59 PM

views 52

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानपरिषदेच्या सभापतींकडून आढावा

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, त्याचप्रमाणे मुंबईहून अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन ...

December 3, 2025 8:19 PM

views 26

तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणारं विधेयक लोकसभेत मंजूर

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरीक्त उत्पादन शुल्क लादायला मंजुरी देणारं विधेयक लोकसभेनं आज आवाजी मतदानानं मंजूर केलं. जीएसटीतला अधिभार रद्द झाल्यावर हे शुल्क लागू होणार आहे. तंबाखू, सिगारेट, सिगार, हुक्का, जर्दा, सुगंधी तंबाखू यासारख्या गोष्टींवर हे अतिरीक्त उत्पादन शुल्क लागू होईल. सध्या यावस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू होतो. या विधेयकात यामुळं सिगारेट पावणे ३ ते ११ रुपयांचं आणि तंबाखू किलोमागे शंभर रुपयांचं उत्पादन शुल्क लागण्याची शक्यता आहे. जीएसटी अधिभार कमी झाल्यानं कमी होऊ शकणाऱ्या कि...

December 1, 2025 2:52 PM

views 31

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कामकाजात अडथळे आले. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे संसदेचं कामकाज आधी दुपारी १२, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं.    लोकसभेत आज कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, निवृत्त कर्नल सोना राम चौधरी, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा आणि रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहिली.  त्यानंतर ...