August 21, 2025 3:05 PM August 21, 2025 3:05 PM
14
संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित
संसदेच्या पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. २१ जुलैला हे अधिवेशन सुरु झालं होतं. आज सकाळी ११ वाजता लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, बिहार मतदारयाद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे गोंधळ सुरु झाला. त्यामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. १२ वाजता कामकाज सुुरु झाल्यावरही गोंधळ सुरुच राहिल्यानं अखेर लोकसभेचं कामकाज पुढच्या अधिवेशनापर्यंत संस्थगित करत असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. या अधिवेशनात लोक...