December 13, 2025 1:16 PM December 13, 2025 1:16 PM
17
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याल्या आज २४ वर्ष पूर्ण होत असून या हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं स्मरण म्हणून देश आज त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. २००१ मध्ये झालेल्या या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली असून या शूरवीरांनी दाखवलेलं धैर्य, साहस आणि समर्पणाला राष्ट्र अभिवादन करत आहे, त्यांची कर्तव्यनिष्ठा देशाच्या राष्टभावनेला सदैव मार्गदर्शन करत राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. य...