December 21, 2024 9:22 AM December 21, 2024 9:22 AM
11
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही कामकाजाचा शेवट निदर्शनं आणि गोंधळातच झाला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरुन तर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी असलेल्या कथित संबंधावरुन आरोप प्रत्यारोप केले. केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या कथित वक्तव्यावरुनही विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्...