December 1, 2025 8:38 PM December 1, 2025 8:38 PM

views 30

संसदेत गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळं दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ, अंध महिला क्रिकेट संघ, महिला कब्बडी संघ आणि डेफलंपिकमध्ये पदकं मिळवणाऱ्यांचं अभिनंदन केलं.    (लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विव...

November 8, 2025 5:15 PM November 8, 2025 5:15 PM

views 768

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपत...

March 15, 2025 2:31 PM March 15, 2025 2:31 PM

views 11

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत लौकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे. या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्यावर्षी स्थगिती दिली होती.   भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषय़क स्थायी समितीने ही सूचना दिली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १७ जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं.

March 10, 2025 1:24 PM March 10, 2025 1:24 PM

views 17

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधे पीएम श्री योजना लागू करण्याला तमिळनाडू सरकारने आधी संमती दिली मात्र आता घूमजाव करुन राज्यसरकार  विद्यार्थ्यांचं नुकसान करीत आहे, अशी टीका प्रधान यांनी केली होती. त्याच्या निषेधात झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आ...

February 3, 2025 3:34 PM February 3, 2025 3:34 PM

views 16

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या ...

February 3, 2025 2:44 PM February 3, 2025 2:44 PM

views 10

महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या ...

January 18, 2025 1:22 PM January 18, 2025 1:22 PM

views 23

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग ८वा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, त्यात ९ बैठका होतील.   यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्...

December 20, 2024 8:19 PM December 20, 2024 8:19 PM

views 54

संसद भवनाच्या आवारात आंदोलन

भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला. नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी या खासदारांची मागणी होती.   विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्य्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झाले...

December 3, 2024 7:17 PM December 3, 2024 7:17 PM

views 14

अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण आणि इतर मुद्यांवरून निदर्शनं करत संसदेत विरोधी पक्ष सदस्यांचा सभात्याग

अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि इतर मुद्यांवरून निदर्शनं करत लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी  आज सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र हे मुद्दे शून्य प्रहरात उपस्थित करावेत, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुुक आणि इतर पक्षाच्या खासदारांनी गदारोळ करत सभात्याग केला.    शून्य प्रहरात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिले...

November 29, 2024 1:21 PM November 29, 2024 1:21 PM

views 13

आम आदमी पक्षाच्या खासदारांचं संसदेबाहेर निदर्शन

दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेबाहेर निदर्शनं केली. दिल्लीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना कराव्यात असं पक्षाचे नेते संजय सिंह यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.     तसंच पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांनीही आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. भारतीय अन्न महामंडळ किमान आधारभूत किमतीत पिकांची खरेदी करत नसल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत कि...