December 2, 2025 8:19 PM December 2, 2025 8:19 PM

views 5

मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही विरोधक चर्चेसाठी आग्रही राहिले. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. त्याआधी सखोल पुनरीक्षणावर तातडीने चर्चा सुरू करण्याची मागणी विरोधी प...

August 8, 2025 1:20 PM August 8, 2025 1:20 PM

दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाज तहकूब

भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्यसैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या ८३ वर्ष होत असून देशाच्या अविरत स्वातंत्र्यलढ्याचा हा निर्णायक टप्पा होता असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं. बिहारमधलं मतदारयाद्यांचं पुनरिक्षण आणि इतर विविध मुद्द्यांवर विविध पक्षांकडून आलेले २० स्थगन प्रस्ताव त्यांनी फेटाळले. त्याच्या निषेधात सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या अधिवेशनात व्यत्यय आल्यानं राज्यसभेच्या कामकाजाचे ५६ तास वाया ...