June 25, 2024 1:55 PM June 25, 2024 1:55 PM

views 7

नवनिर्वाचित संभासदांचा शपथविधी आजही सुरू

  १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी सुरू आहेत. काँग्रेस खासदार गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे, भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांनी आज शपथ घेतली.   काँग्रेस खासदार शोभा बच्छाव, भाजपा खासदार स्मिता वाघ यांनी मराठीतून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्लीशमधून शपथ घेतली....

June 25, 2024 9:41 AM June 25, 2024 9:41 AM

views 20

सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील-प्रधानमंत्र्यांची ग्वाही

18 वी लोकसभा विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल, असं सांगून सरकार सर्वांना सोबत घेऊन लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिली. संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते, मात्र देश चालवण्यासाठी सर्वांचं एकमत होणं महत्त्वाचं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

June 24, 2024 1:36 PM June 24, 2024 1:36 PM

views 10

संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाने १८ व्या लोकसभेचे पहिलं अधिवेशन सुरू होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठा सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. आपल्या सरकारला सर्वांना सोबत घेऊनआणि संविधानाचे पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचं लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सोहळा नवीन संसद भ...