August 17, 2024 2:03 PM August 17, 2024 2:03 PM

views 12

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांसाठी भारताचा ८४ खेळाडूंचा चमू रवाना

पॅरिस इथं सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा, ‘८४ खेळाडूंचा चमू’ काल रवाना झाला. या चमूतल्या ५० क्रीडापटूंना ऑलिम्पिक साठी विशेष प्रशिक्षण योजनेचा फायदा झाल्याचं, तसंच यापैकी अनेक क्रीडापटू खेलो इंडिया स्पर्धेतून पुढे आल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या खेळाडूंना निरोप देताना सांगितलं. २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात टोक्यो पॅरालिम्पिकचा सुवर्णपदकविजेता सुमित अंतिल आणि ग...

August 9, 2024 7:30 PM August 9, 2024 7:30 PM

views 4

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवशी कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात आहेत. कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात कास्यपदक पटकावण्याच्या उद्देशाने अमन सेहरावत आज रात्री लढत देईल. गोल्फमध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचा तिसऱ्या फेरीचा सामना सध्या सुरू आहे. दरम्यान, ॲथलेटिक्समध्ये महिला आणि पुरुष संघ ४०० मीटर रिले स्पर्धेत पुढच्या फेरीत जाण्यात अयशस्वी ठरले. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं काल रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कास्यपदकाला गवसणी घातली....

August 6, 2024 5:59 PM August 6, 2024 5:59 PM

views 10

नोव्हाक ज्योकोविचः ‘गोट’ ते ‘करिअर गोल्डन स्लॅम’

विख्यात टेनिसपटू, २४ वेळा ग्रँडस्लॅम पदकविजेता नोव्हाक ज्योकोविच यानं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस एकेरीचं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच करिअर गोल्डन स्लॅम, अर्थात आपल्या कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि शिवाय ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावणाऱ्या काही मोजक्या टेनिसपटूंच्या यादीत नोव्हाक ज्योकोविचच्या नावाची भर पडली. या उमद्या खेळाडूविषयी.. १४ जुलै २०२४. विम्बल्डनच्या अतिशय प्रतिष्ठित सेंटर कोर्टवर एकदोनदा नव्हे, तर दहा वेळा अजिंक्यपदासाठी लढत दिलेला आणि सात वेळा विम्बल्डनची देखणी ट्र...

August 6, 2024 3:28 PM August 6, 2024 3:28 PM

views 7

भारतीय बॅडमिंटन विश्वातला खंदा सेनापती : लक्ष्य सेन

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताचा एकमेव शिलेदार लक्ष्य सेनचं कास्यपदक अगदी थोडक्यात हुकलं. पहिला गेम जिंकून घेतलेली आघाडी त्याला टिकवता आली नाही आणि त्याचा प्रतिस्पर्धी मलेशियाचा ली झी जिया यानं पुढचे दोन्ही गेम्स जिंकून त्याला हरवलं. लक्ष्यकडे पदकाच्या आशेने बघत असलेल्या सगळ्यांसाठीच हा धक्का होता. आणि ते साहजिकही आहे. पण, ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू हा मान लक्ष्य सेननं पटकावलाय आणि ही गोष्ट नक्कीच छोटी नाही. चला तर मग, आकाशवाणी म...

August 5, 2024 7:40 PM August 5, 2024 7:40 PM

views 13

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण्याचा या टपाल तिकीट संचामागचा उद्देश असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 5, 2024 10:01 AM August 5, 2024 10:01 AM

views 8

पॅरीस ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये, भारतीय हॉकी संघानं काल पेनल्टी शूट आउटमध्ये ब्रिटनला 4-2 अशी मात देत उपांत्य फेरीत धडक मारली. अमित रोहितदासला रेड कार्ड दाखवल्यानंतर दहा खेळाडूंच्या भारतीय संघानं संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूट आऊट मध्ये चार गोल करुन विजय खेचून आणत भारताच्या संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, बँडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

August 4, 2024 7:23 PM August 4, 2024 7:23 PM

views 13

पॅरिस ऑलिम्पिक : पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा गोलफरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मात्र भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ७५ किलो वजनी गटात चीनच्या ली क्वियान हिनं टोक्यो ऑलिम्पिकची पदकविजेती लोव्हलीना बोर्गोहाइन हिचा ४-१ असा पराभव केला. नेमबाजीत २५ मीटर ...

August 2, 2024 3:29 PM August 2, 2024 3:29 PM

views 20

पॅरिसमध्ये बॅडमिंटन नेमबाजी हॉकीसह विविध स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष

पॅरिस ऑलिंपिक्सच्या आजच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडू बँडमिंटन, २५ मिटर पिस्तुल. हॉकी, ज्यूडो तसचं जलतरण स्पर्धेत सहभागी होत आहे. पुरुषांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना चीन तैपैईच्या चाऊ तियेन चेन बरोबर होणार आहे. दोन कांस्य पदक पटकावणारी मनु भाकर आज २५ मिटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत दाखल होत आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियन संघाबरोबर होणार आहे. भारतीय संघानं या आधीच उंपात्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ज्यूडोच्या ७८ किलो वजनी गटात आज भा...

August 1, 2024 5:25 PM August 1, 2024 5:25 PM

views 6

टीसीने मिळवले ऑलिम्पिक पदक…

रेल्वेत टीसी म्हणून काम आणि क्रीडाक्षेत्रातली अविस्मरणीय कामगिरी, हे वर्णन ऐकून कुणाची आठवण येते? मला माहितीये, तुमच्या मनात भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचं नाव आलं असेल, बरोबर ना? आता, धोनीसोबतच आणखी एका भारतीय क्रीडापटूचं नाव या वर्णनाशी तंतोतंत जुळेल. स्वप्नील कुसळे. तो मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासक म्हणून काम करतो आहे. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्यपदकाचा अचूक वेध घेतला आणि आणि भारताच्या पदकांची हॅटट्रिक साधली. भार...