January 2, 2025 10:04 AM January 2, 2025 10:04 AM

views 9

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनाण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले. ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा...

September 7, 2024 7:29 PM September 7, 2024 7:29 PM

views 44

पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या होकातो होतोझे सेमा याला कांस्यपदक

पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या गोळाफेकीत होकातो होतोझे सेमा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपतींनी सेमा याच्या कामगिरीचं समाजमाध्यमाद्वारे कौतुक केलं. एका भुसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यानं आपल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या  पदार्पणातच पदक जिंकल्याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला. तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर हा देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरे...

September 4, 2024 7:09 PM September 4, 2024 7:09 PM

views 28

पॅरालिंपिक पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सचिन खिलारीनं पटकावलं रौप्य पदक

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताच्या सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ ४६ प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं, अशी एकूण २१ पदकं जिंकली आहेत.   दरम्यान, महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत अमिषा रावत ही १५व्या स्थानावर राहिली. नेमबाजीत रुद्रांश खंडेलवाल आणि निहाल सिंग हे मिश्र ५० मीटर पिस्तुल एसएच १ प्रकारात पात्र ठरू शकले नाह...

September 4, 2024 1:17 PM September 4, 2024 1:17 PM

views 5

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून खेळाडूंचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केलं आहे.  या खेळाडूंची  कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याची आकांक्षा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देईल, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना भारताला य...

September 2, 2024 12:40 PM September 2, 2024 12:40 PM

views 28

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्देन या जोडीला काल तिसऱ्या फेरीत मॅक्सिमो गोन्झालेस आणि आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीकडून १-६, ५-७ असा थेट सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.   मिश्र दुहेरीत मात्र रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियाची साथीदार ॲल्डिला सुत्जियादी या जोडीचं स्पर्धेतलं आव्हान कायम आहे. दरम्यान, महिला एकेरीत गतविजेत्या कोको गॉफला एमा नावारो हिनं ६-३, ४-६, ६-३ असं...

September 2, 2024 12:54 PM September 2, 2024 12:54 PM

views 24

पॅराऑलिम्पिंकमध्ये भारताला उंच उडीमध्ये रौप्य, तर धावण्यात कास्यपदक

  पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पाल हिनं महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कास्यपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी पदकतालिकेत आणखी भर पडण्याची आशा आहे. तिरंदाज शीतल देवी आणि राकेश कुमार, धावपटू दीप्ती जीवनजी, भालाफेकपटू सुमित अंतिल, थाळीफेकपटू योगेश कथुनिया यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.   बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताला पदकं मिळण्याची आशा आहे. पु...

August 31, 2024 1:02 PM August 31, 2024 1:02 PM

views 34

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या  यादीत झळकावल्याबद्दल राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे. देशाला तिच्या ऐतिहासिक आणि असामान्य कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्तुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या  मनीष नरवाल यालाही राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत. मनीषच्या कामगिरीने नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं त्या म्हणाल्या. महिलांच्...

August 30, 2024 10:43 AM August 30, 2024 10:43 AM

views 10

पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये शीतलदेवी आणि राकेशकुमार यांचा मिश्र तिरंदाजी प्रकारात नवा विक्रम.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार या भारतीय खेळाडूंनी तिरंदाजी स्पर्धेत 1399 च्या एकत्रित गुणांसह एक नवीन विक्रम केला आहे. आता हे दोन्ही खेळाडू 2 सप्टेंबरला अव्वल मानांकित खेळाडू म्हणून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आज विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता आणि अंतिम फेरीत सहभागी होईल. तर सुहास यथीराज त्याचा बॅडमिंटनमधील दुसरा सामना खेळणार आहे. याशिवाय ॲथलेटिक्स स्पर्ध...

August 8, 2024 12:44 PM August 8, 2024 12:44 PM

views 43

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने केली निवृत्तीची घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट हिनं आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली. समाजमाध्यमावर पोस्ट करत आपण सर्व चाहत्यांच्या आणि देशवासियांच्या कायम ऋणात राहू असं विनेशनं म्हटलं आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात तिने क्रीडा लवादाकडे अपिल केलं असून आपल्याला संयुक्तपणे रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.

August 5, 2024 10:01 AM August 5, 2024 10:01 AM

views 8

पॅरीस ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये, भारतीय हॉकी संघानं काल पेनल्टी शूट आउटमध्ये ब्रिटनला 4-2 अशी मात देत उपांत्य फेरीत धडक मारली. अमित रोहितदासला रेड कार्ड दाखवल्यानंतर दहा खेळाडूंच्या भारतीय संघानं संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूट आऊट मध्ये चार गोल करुन विजय खेचून आणत भारताच्या संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, बँडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.