August 7, 2024 1:21 PM

views 24

वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट पॅरीस ऑलिम्पिकमधून अपात्र

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही. कालच विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय महिला पैलवान ठरली होती. तिनं ५० किलो वजनी गटात क्युबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझ हिच्यावर ५-० अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता...