September 11, 2024 8:12 PM September 11, 2024 8:12 PM
31
पॅरालिम्पिकमधल्या शीतल देवी आणि राकेश कुमार या क्रीडापटूंची दिव्यांग मतदारांचे राष्ट्रीय प्रणेते म्हणून निवड
भारतीय निवडणूक आयोगानं पॅरालिम्पिकमधल्या नेमबाजी स्पर्धेत विजेते ठरलेल्या शीतल देवी आणि राकेश कुमार या क्रीडापटूंची दिव्यांग मतदारांचे राष्ट्रीय प्रणेते म्हणून निवड केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात या दोन्ही क्रीडापटूंचा सत्कार करत त्यांची मतदारांचे प्रणेते म्हणून निवड केली. जम्मू काश्मीर मधले हे दोन्ही क्रीडापटू तिथल्या आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दिव्यांग मतदारांना प्रोत्साहित करतील असा विश्वास राजीव कुमार यांनी यावेळी व्यक...