September 3, 2024 3:10 PM
41
पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत पंधराव्या स्थानावर
पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत, देशाच्या पदकसंख्येत काल आणखी भर घातली. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत पंधराव्या स्थानावर आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, तिरंदाजी, ॲथलेटिक्स या खेळांमध्ये पदकांसाठी लढत देतील. नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल या महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच एक प्रकारासह अन्य प्रकारांमध्ये खेळणार आहेत. महिलांच्या रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज पूजा, महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ चौतीस प्रकाराच्या अंतिमफेरीत भाग्यश्री जाधव...