July 30, 2024 7:38 PM July 30, 2024 7:38 PM

views 14

पॅरिस ऑलिम्पिक : नेमबाजीत मनु भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीला कास्यपदक

पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच क्रीडा प्रकारात एकाच ऑलिंपिकमधे दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सरबजोत सिंग याने त्याचं पहिलं ऑलिंपिक पदक पटकावलं आहे.   भारताच्या हॉकी संघाने आयर्लंडवर २-० अशी मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या...

July 29, 2024 8:43 PM July 29, 2024 8:43 PM

views 10

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग ही भारतीय जोडी पुढच्या फेरीत दाखल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत पुरुष गटात अर्जुन बबुता आणि महिला गटात रमिता जिंदल यांना पदक मिळवण्यात अपयश आलं. अंतिम क्रमवारीत रमिता सातव्या स्थानावर तर अर्जुन चौथ्या स्थानावर राहिल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी पुढच्या फेरीत गेली. त्यांचा सामना उद्या इंडोनेशियाच्या फजर अल्फीयान आणि मुहम्मज रियान अर्डिअंटो या जोडीशी होईल.   आज पुरुष हॉकीत भारत आणि अर्ज...

July 28, 2024 2:29 PM July 28, 2024 2:29 PM

views 12

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात मनू भाकरची आज लढत

पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत गाजवला. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत मनू भाकर हिनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही फेरी आज रंगणार आहे.   पुरुष हॉकी संघानं ब गटाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात करून विजयी सलामी दिली. भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही उत्तम सुरुवात केली. दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांनी, तर एकेरीत लक्ष्य सेन यानं पुढची फेरी गाठली.   टेबल टेसिनच्या पुरुष एकेरीच्या प्राथमिक फेरीत...