August 8, 2024 7:23 PM August 8, 2024 7:23 PM

views 14

पॅरिस ऑलिंपिकमधे कुस्तीगीर अमन सहरावतचा उपांत्य फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कुस्तीपटू अमन सहरावत याने ५७ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने अल्बेनियाच्या झेलिमखान अबाकारोव्ह याचा १२-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत सहरावतचा सामना जपानच्या रेई हिग्युची याच्याशी आज रात्री पावणे दहा वाजता होणार आहे.   पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत सुरू असून भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पदकासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल.   दरम्यान, भारताची वेटलिफ्टर म...

August 7, 2024 7:32 PM August 7, 2024 7:32 PM

views 11

पॅरिस ऑलिम्पिक : १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी पुढच्या फेरीत दाखल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी हिनं सातवं स्थान मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. कुस्तीत महिलांच्या ५३ किलो वजनी अंतिम पंघलला तुर्किएच्या प्रतिस्पर्ध्याकडून १०-० असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या टेबल टेनिस सांघिक उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीनं भारताचा ३-१ असा पाडाव केला. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अन्नू राणी हिला अपयश आलं. मॅरेथॉन रेस वॉक मिश्र रिले स्पर्धेत सूरज पन्वर आणि प्रियांका गोस्वामी या दोघांनाही स्पर्धा पूर्ण करता आली ना...

August 6, 2024 7:04 PM August 6, 2024 7:04 PM

views 1

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पात्रता फेरीत ब गटातून पहिल्याच प्रयत्नात त्यानं ८९ पूर्णांक ३४ शतांश मीटर इतका लांब भाला फेकला. या हंगामातली नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  महिलांच्या ५० किलो वजनी गटातल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न कायम आहे. विनेशनं उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओकसाना लिवाच हिला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत विन...

August 6, 2024 10:09 AM August 6, 2024 10:09 AM

views 11

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत

आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी, अथ्लेटिक्स, टेबल टेनिस आणि कुस्ती या प्रकारात होणाऱ्या स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. हॉकीमध्ये आज भारताचा उपांत्य फेरीतील सामना जर्मनीशी होणार आहे. अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं यावेळी मात्र सुवर्ण पदक पटकावण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरेल.

August 6, 2024 10:01 AM August 6, 2024 10:01 AM

views 11

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या अविनाश साबळेची पुरुषांच्या स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अविनाश साबळे याने काल ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र असलेल्या अविनाशनं काल रात्री झालेली ही शर्यत पाचव्या क्रमांकानं पूर्ण करत ८ मिनिट आणि १५ पूर्णांक ४३ सेकंदांची वेळ दिली आणि अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. येत्या ८ ऑगस्टला ही अंतिम फेरी होणार आहे.   भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला मात्र काल कास्य पदकानं हुलकावणी दिली. नेमबाजीमध्येही मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि...

August 5, 2024 1:38 PM August 5, 2024 1:38 PM

views 15

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत. टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज ...

August 2, 2024 8:24 PM August 2, 2024 8:24 PM

views 15

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला तिसऱ्या पदकाची संधी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आगेकूच केली. नेमबाजीत दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ५९० गुण कमावून अंतिम फेरीत दाखल झाली. त्यामुळे तिला या स्पर्धेत तिसरं पदक मिळवण्याची संधी आहे.   तिरंदाज अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवर यांनी स्पेनला ३-५ असं नमवून उपांत्य फेरी गाठली. हॉकीत भारताच्या पुरुष संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३-२ अशी मात केली. दरम्यान, नौकानयन स्पर्धेत विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमनन, तर गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि ग...

August 2, 2024 3:29 PM August 2, 2024 3:29 PM

views 13

तिरंदाजीत भारताचे अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवरा मिश्र सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस सकारात्मक पद्धतीनं सुरू झाला. तिरंदाजीत अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवरा यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाच्या जोडीचा ५-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. यंदा दोन कास्यपदकांवर नाव कोरणारी नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्टल प्रकारात पुढच्या फेरीत दाखल झाली. याशिवाय आज नौकानयनात विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमारन, तसंच गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणइ गगनजीत भुल्लर मैदानात उतरणार आहेत. हॉकी स्पर्धेत आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. तर बॅडमिंटनमध्ये पुरुष...

August 1, 2024 7:43 PM August 1, 2024 7:43 PM

views 12

नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव…

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदकाला गवसणी घालणारा नेमबाज स्वप्नील कुसळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतानं नेमबाजीत तीन पदकं मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वप्नीलच्या समर्पण आणि चिकाटीमुळे जागतिक मंचावर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी त्यानं केली असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल स्वप्नील कुसळेचं कौतुक केलं आहे....

July 31, 2024 8:22 PM July 31, 2024 8:22 PM

views 18

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा पुढच्या फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आगेकूच सुरु ठेवली. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं पॅरिस महिला एकेरीत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तिनं एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबा हिच्यावर २१-५, २१-१० अशी सहज मात केली. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा जोनातन क्रिस्टी याचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला.   पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे यानं सातवं स्थान मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर अकराव्या स्थानावर राहिल...