September 10, 2024 8:18 PM September 10, 2024 8:18 PM
28
पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा सत्कार
पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं आयोजित समारंभात केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीसाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना ३० लाख रुपये बक्षीस देण्यात आलं.