August 10, 2024 8:42 PM August 10, 2024 8:42 PM

views 24

महिलांच्या फ्री स्टाईल ७६ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत कुस्तीपटू रितिका हुड्डाचा पराभव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताची कुस्तीपटू रीतिका हूडा हिला ७६ किलो वजनी गटात हार पत्करावी लागली. किर्गिस्तानची अव्वल मानांकित कुस्तीपटू मेडेट कायझी ऎपेरी हिनं रीतिकाचा पराभव केला.  गोल्फमध्येही अदिती अशोक आणि दीक्षा सागर यांना अनुक्रमे ३३ व्या आणि ५१ व्या स्थानावर समाधान मानावं लागल्याने ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. 

August 7, 2024 8:21 PM August 7, 2024 8:21 PM

views 16

पैलवान विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध संयुक्त जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडे नोंदवल्याची माहिती क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्र सरकार महिला पैलवानांना सर्व प्रकारची मदत देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मुद्द्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्याशी चर्चा केली असल्याचं त्यांनी निवेदनात सांगितलं. या परिस्थितीत आपल्याकडे काय पर्याय आहेत, याची चाचपणी करण्याची सूचना संघटनेला दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.   विनेश फोगाट ह...

August 5, 2024 7:40 PM August 5, 2024 7:40 PM

views 12

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण्याचा या टपाल तिकीट संचामागचा उद्देश असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 5, 2024 1:38 PM August 5, 2024 1:38 PM

views 14

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत. टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज ...

July 30, 2024 9:49 AM July 30, 2024 9:49 AM

views 14

पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीच्या मिश्रप्रकारात भारताची जोडी आज कास्य पदकासाठी लढणार

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये काल नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या मानू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्या जोडीने उत्तम कामगिरी केली असून ते कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे.   हॉकी मध्ये काल पूल बी सामन्यात भारताचा सामना अर्जें‍टीना संघाशी होऊन तो बरोबरीत सुटला. आज भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना आयर्लंड शी होणार आहे.   बॅडमिंटन मध्ये भारतीय मानकीत खेळाडू लक्ष्य ...

July 27, 2024 8:29 PM July 27, 2024 8:29 PM

views 22

पॅरिस ऑलिंपिक : नेमबाज मनू भाकरचा महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मनु भाकरने पात्रता फेरीत ५८० गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं. तर रिदम सांगवानला १५ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात भारताचं आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारताचे संदीप सिंग आणि एलविन वलारिवान या जोडीला पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर  तर अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल या  जोडीला ६ व्या क्रमांकावर समाधान म...

July 27, 2024 1:37 PM July 27, 2024 1:37 PM

views 18

पॅरिस ऑलिंपिकची दिमाखदार सोहळ्यानं सुरूवात

  मुसळधार पाऊस असतानाही पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. देशोदेशीच्या खेळाडूंच्या पथकांनी मैदानात नेहेमीच्या प्रथेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं संचलन केलं. जवळपास सात हजार खेळाडूंनी पॅरिसमधल्या सीन नदीतून बोटीतून येऊन उपस्थितांना अभिवादन केलं. ज्युदोमध्ये तीन वेळा विजेता ठरलेला टेडी रायनर यानं ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. भारताच्या पथकाचं नेतृत्व पीव्ही सिंधू आणि शरत कमल यानी केलं. आजपासून स्पर्धांना सुरुवात होत असून जगभरातील सात हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत...

July 26, 2024 7:40 PM July 26, 2024 7:40 PM

views 16

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आज औपचारिक उद्घाटन

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा उद्घाटन सोहळा आज होत असून, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिसमधल्या  सीन नदीच्या किनाऱ्यावर या  भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियम बाहेर उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी सीन नदीमध्ये १० हजार खेळाडूंना घेऊन १०० नौका परेड मध्ये सहभागी होतील.    स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेली परेड पॅरिस मधल्या काही महत्वाच्या  स्थळांवरून पुढे जाईल. तीन तासांचा हा कार्यक्रम जगाला पॅरिसचा  इतिहास आणि स्थापत...

July 20, 2024 1:59 PM July 20, 2024 1:59 PM

views 10

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलाचे २४ जवान

पॅरिस इथं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये चोवीस सशस्त्र दलाचे जवान सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध भालाफेकपटू आणि २०२० मधल्या टोकियो ऑलिंपिक मधला सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याच्यासह एकूण २२ पुरुष आणि दोन महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.   भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांच्या तुकडीतल्या दोन महिला खेळाडूंचं सादरीकरण या स्पर्धांमध्ये पाहता येईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. नीरज चोप्रा यंदाही विजेतेपदासाठी ...

July 17, 2024 8:39 PM July 17, 2024 8:39 PM

views 12

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं शिक्कामोर्तब

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. संघात ११७ खेळाडूंचा समावेश असून सोबत १४० तज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी असतील.   एथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक २९ खेळाडूंची निवड झाली असून नेमबाजीसाठी २१ जण भाग घेणार आहेत. हॉकीसाठी १९, टेबल टेनिसकरता आठ आणि बॅडमिंटनसाठी सात खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. मुष्टियुद्ध आणि तिरंदाजीसाठी प्रत्येकी ६, गोल्फ साठी ४ तर टेनिसकरता ३ खेळाडूंचा समावेश संघात केला आहे. याखेरीज जलतरण, नौकानयन, भारोत्तोलन, ज्युदो इत्...