August 7, 2024 8:06 PM August 7, 2024 8:06 PM
13
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : पैलवान Vinesh Phogat हिला लिहिलेलं हे पत्र…
प्रिय विनेश... ऑलिम्पिकचं पदक तुझ्या गळ्यात विसावलं असतं, तर ते पदक सुंदर झालं असतं. तू पदक गमावलेलं नाहीस विनेश, पदकाने तुला गमावलंय... काही ग्रॅम वजन जास्त भरलं म्हणून भले तुला स्पर्धेतून अपात्र ठरवलं असेल त्यांनी, पण कालच्या दिवसभरात तू दिलेला आनंद, अभिमान पदकापेक्षा कमी आहे का गं? आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी तू स्वतःच अस्सल सोनं आहेस, होतीस आणि राहशील. कुठल्या पदकाची गरजच नाही त्यासाठी. पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानात कालच्या दिवशी तू केलेली जादुई कामगिरी अजूनही डोळ्यांत, मनात तश्...