June 21, 2025 10:44 AM June 21, 2025 10:44 AM

views 24

पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने विजयी

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत विजय मिळवला. ऑलिम्पिकविजेत्या चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88 पूर्णांक 16 मीटर फेक करत विजेतेपदाला गवसणी घातली. जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या तर ब्राझीलचा लुईस मॉरिसियो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

July 8, 2024 1:11 PM July 8, 2024 1:11 PM

views 14

पॅरिस डायमंड लीगमध्ये स्टीपलचेस प्रकारात भारताच्या अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम

पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेला भारतीय धावपटू अविनाश साबळे यानं काल डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. पॅरिसच्या चार्लेटी मैदानावर झालेल्या स्पर्धेत अविनाशने ८ मिनिटं , ९ सेकंद आणि ९१ मायक्रोसेकंदां मध्ये अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमासह अविनाशला स्टीपलचेस प्रकारात सहावं स्थान मिळवता आलं. जुना राष्ट्रीय विक्रमही अविनाशच्या नावावर नोंदला आहे. दोन वर्षांपूर्वी अविनाशनेच बर्मिंघमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेस प्रकार...