October 22, 2025 1:04 PM October 22, 2025 1:04 PM

views 76

पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून राजघराण्याचे दागिने चोरीला

पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून अंदाजे ८८ दशलक्ष युरो अर्थात १०२ दशलक्ष डॉलर्स किमतीचे राजघराण्याचे दागिने चोरीला गेले आहेत. फ्रान्सच्या सरकारी वकील लॉरे बेक्को यांनी ही माहिती दिली. या दागिन्यांचं ऐतिहासिक मूल्य बाजारमूल्यापेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   काल सकाळी चार संशयितांनी गॅलरी दी अपोलॉन इथून क्रेनच्या सहाय्यानं ही चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मेरी-लुईस आणि महाराणी युजीन यांच्याशी सबंधित फ्रेंच राजघराण्याच्या आठ दुर्मीळ वस्तू चोरीला गेल्या असल्याचं त्यांनी सांगित...

December 7, 2024 5:38 PM December 7, 2024 5:38 PM

views 13

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार आहेत. दोन शतकांच्या कालावधीत बांधलेल्या आणि साडेपाच वर्षांपूर्वी लागलेल्या भयंकर आगीत जवळपास भस्मसात झालेल्या या ८६१ वर्षं जुन्या वास्तूची पुनर्बांधणी फक्त पाच वर्षांत करणं हे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मोठं यश मानलं जात आहे. नॉत्रे दाम कॅथेड्रलच्या आज संध्याकाळी होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जगभरातल्या विविध देशांचे नेते आणि भाविक यांच्यासह सुमारे दीड हजार लोक उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेड...

August 11, 2024 10:20 AM August 11, 2024 10:20 AM

views 12

सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना काल पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला.   ऑलिम्पिक ऑर्डर हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ऑलिम्पिकमधील योगदानाची दखल घेत अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलं. बिंद्रानं २००८ बीजिंग इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत १०-मीटर एअर रायफल स्पर्धेत भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलं होतं. आपल्या कारकिर्दीत १५० हून अधिक...

August 9, 2024 7:30 PM August 9, 2024 7:30 PM

views 4

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवशी कुस्ती, ॲथलेटिक्स आणि गोल्फ स्पर्धेत भारताचे खेळाडू मैदानात आहेत. कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात कास्यपदक पटकावण्याच्या उद्देशाने अमन सेहरावत आज रात्री लढत देईल. गोल्फमध्ये अदिती अशोक आणि दीक्षा डागर यांचा तिसऱ्या फेरीचा सामना सध्या सुरू आहे. दरम्यान, ॲथलेटिक्समध्ये महिला आणि पुरुष संघ ४०० मीटर रिले स्पर्धेत पुढच्या फेरीत जाण्यात अयशस्वी ठरले. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं काल रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कास्यपदकाला गवसणी घातली....

July 5, 2024 2:52 PM July 5, 2024 2:52 PM

views 12

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर झालं आहे. त्यात नीरज चोप्रा, अविनाश साबळे, कुशोर कुमार जेना, सर्वेश कुशारे, अक्षदीप सिंह या पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. तर किरण पहल, पारुल चौधरी, ज्योती याराजी, प्रियांका गोस्वामी या महिला खेळाडूही या पथकात असतील. धावणे, भालाफेक, गोळाफेक, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, उंच उडी, रिले आणि मिश्र मॅरेथॉन अशा विविध खेळांमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरी गाठली होती.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या पथकातल्या खेळाडूंशी संवाद साधला. ऑलिम्पिक स्पर्धेतून फक्त ...