December 31, 2025 2:31 PM

views 43

परीक्षा पे चर्चा उपक्रमात सहभागी होण्यासाठी तीन कोटींहून अधिक जणांची नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाने ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून कालपर्यंत तीन कोटींहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यात सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं तसंच परीक्षांच्या अनुषंगाने त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.   

February 18, 2025 11:10 AM

views 20

परीक्षा पे चर्चा २०२५चा नवीन भाग आज प्रसारित होणार

परीक्षा पे चर्चा 2025 चा नवीन भाग आज प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध परीक्षा मंडळांच्या परीक्षेत प्रथम आलेले यशस्वी विद्यार्थी आपले अनुभव सांगणार आहेत. तसच परीक्षा काळात चिंता , तणाव यांचा यशस्वीपणे सामना कसा करावा याबाबत आपले अनुभव हे यशस्वी विद्यार्थी यामध्ये सांगणार आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल समाजमाध्यमावर याबद्दलची एक ध्वनिचित्रफित प्रसारित केली.

February 15, 2025 8:18 PM

views 27

विद्यार्थ्यांना मदत करणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यंदा वेगळ्या स्वरुपात सादर

परीक्षेच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यात विद्यार्थ्यांना मदत करणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यंदा वेगळ्या स्वरुपात सादर होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन पहिल्या भागात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना लाभलं. त्यानंतर सहा भागात विविध क्षेत्रातले यशस्वी मान्यवर आपापले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अध्यात्मिक क्षेत्रातले अग्रणी सद्गुरु यांनी आज विचार मांडले. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता विक्रांत मेस्सी उद्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

February 10, 2025 6:48 PM

views 30

विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भितीवर विजय मिळवावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा हा संवाद ऐकल्यानंतर ते बोलत होते. परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे समजण्यासाठी प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद उपयुक्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.