December 6, 2025 2:49 PM December 6, 2025 2:49 PM

views 20

परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या ९व्या आवृत्त्तीच्या पार्श्वभूमीवर मायगव्ह – या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरु

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या ९व्या आवृत्त्तीच्या पार्श्वभूमीवर मायगव्ह - या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरु आहे. ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित ही स्पर्धा ११ जानेवारीपर्यंत खुली राहणार आहे. इयत्ता ६ ते १२ वी पर्यंतचे विदयार्थी तसंच पालक आणि शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम जानेवारी २०२६ मध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात भारतातले तसंच परदेशातले वि...

August 5, 2025 1:13 PM August 5, 2025 1:13 PM

views 3

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाला गिनेसच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाला गिनेसच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान मिळालं आहे. 'नागरिकांचा सहभाग असलेल्या ऑनलाइन प्रणालीवर एका महिन्यात सर्वाधिक नोंदणीचा'  जागतिक विक्रम परीक्षा पे चर्चानं केला आहे. माय गव्ह या प्रणालीवर परीक्षा पे चर्चाच्या आठव्या भागासाठी तीन कोटी ५३ लाख नागरिकांनी नोंदणी केली होती. त्याची दखल घेऊन गिनेसनं जागतिक विक्रमांच्या यादीत नोंद केली आहे. या जागतिक विक्रमाबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र नवी दिल्लीत काल प्रदान ...

February 17, 2025 9:13 AM February 17, 2025 9:13 AM

views 16

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचं मार्गदर्शन

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कालच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करावा असा सल्ला, विक्रांत मेस्सी यानं दिला. त्यांनी पालकांना मुंलामुलांमध्ये स्पर्धा न करण्याचा, तसंच मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नये, असं आवाहन केलं.

February 10, 2025 8:39 PM February 10, 2025 8:39 PM

views 12

प्रधानमंत्र्यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विद्यार्थ्यांशी संवाद नव्या स्वरुपात सादर

विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना केवळ परीक्षेत गुण मिळवण्याचा विचार न करता संबंधित विषयावर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.    परीक्षेप्रमाणेच जीवनशैली विषयक अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरं दिली. पर्यावरण, कौटुंबिक नातेसंबंध अशा विविध विषयांचा त्यात समावेश होता.    परीक्षेच्या ताणताणावाचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमात प्रधानमंत्री विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. का...

January 14, 2025 5:43 PM January 14, 2025 5:43 PM

views 15

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी झाली आहे.  यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे, अशी माहिती  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.  या कार्यक्रमासाठीच्या नोंदणीला 14 डिसेंबर 2024 ला सुरुवात झाली असून, आज शेवटचा दिवस आहे.  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  mygov.in वर लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.  या उपक्रमाचं हे आठवं सत्र असून परिक्षा म्हणजे  शिक्षणाचा उत्सव असल्याची भावना लोकांमध्ये जागत असल्याचं ...

December 20, 2024 11:14 AM December 20, 2024 11:14 AM

views 8

जानेवारी २०२५ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा आठवा भाग सादर होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर वर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात अर्थात जानेवारी 2025 मध्ये सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, 14 जानेवारीपर्यंत MyGov पोर्टलवर नोंदणी करता येईल. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.