December 12, 2024 7:12 PM

views 27

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीत केली पाहणी

परभणीमधल्या संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परभणीत जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, दानवे यांनी नुकसान झालेल्या व्यापारी आस्थापनांची, तसंच इतर ठिकाणांची पाहणी केली.   दरम्यान, काल झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आस्थापना बंद ठेवण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत आज व्यापारी संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची ...

December 12, 2024 3:31 PM

views 33

वाशिम आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद

परभणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीच्या अवमानना प्रकरणी काल झालेल्या आंदोलनात अनेक एसटी बसचं नुकसान झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं आज सकाळपासून वाशिम आगारातून हिंगोली, परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या एसटी गाड्या वाशिम आगारात थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्याही वाशिम बस स्थानकावर उभ्या आहेत. यामुळे वाशिम येथील बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याची म...

December 11, 2024 8:05 PM

views 15

परभणीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, जमावबंदीचे आदेश लागू

परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची अवहेलना केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी केलेलं आंदोलन आज तीव्र झालं. आंबेडकरी संघटनांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली तसंच ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला. काही ठिकाणी दगडफेक आणि दुकानाची मोडतोड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  परभणीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी शांततेचं आवाहन केलं आहे.

November 17, 2024 3:31 PM

views 38

मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशानं परभणी शहरात आज सायकल रॅली

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं परभणी शहरात आज सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानपॆक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक सायकलप्रेमींनी या रॅलीत सहभागी होऊन घोषणा देत नागरिकांचं लक्ष वेधलं.

November 10, 2024 11:05 AM

views 26

मतदान जनजागृतीसाठी परभणीत मॅरेथॉनचं तसेच सायकल रॅलीचं आयोजन

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

November 9, 2024 4:30 PM

views 33

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज परभणीत प्रचारसभा

महायुती सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा होता, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते.   महायुती सरकारनं साडे सात अश्वशक्ती पम्पाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं, तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणाले.  

September 23, 2024 7:17 PM

views 24

परभणीत धनगर समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन

परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी आज धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगड या जमातीचे राज्यात लोक राहत नसून धनगर या जातीचे लोक राहतात त्यामुळे धनगड ऐवजी धनगर शब्द वापरून धनगर समाजाला केंद्र आणि राज्यात एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पूर्णा, पालम, गंगाखेड, झरी, पाथरी अशा विविध 11 ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले, याला चांगला प्रतिसाद मिळाला असून धनगर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

September 18, 2024 8:37 AM

views 21

अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी परभणी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळेल – पालकमंत्री संजय बनसोडे

अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.

September 7, 2024 3:33 PM

views 32

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या थकित पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा

परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या थकित पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळं पैसे काढण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी २०२१ या वर्षातल्या थकीत पीक विम्याचे २२५ कोटी रुपये आठ दिवसांत जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती.  

August 26, 2024 8:43 AM

views 21

परभणी : चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता

परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील, यावर भर देण्याचे निर्देश बनसोडे यांनी यावेळी दिले.