December 18, 2024 7:24 PM

views 12

परभणी शहरात हिंसाचारप्रकरणी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी-धर्मपाल मेश्राम

परभणी शहरात हिंसाचारा दरम्यान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांना कोणत्याही FIR ची सक्ती न करता पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच या प्रकरणात ज्यांच्या विरोधात जनाक्रोश आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत अशा तीन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावं, असे आदेश  राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

December 13, 2024 7:20 PM

views 12

परभणी प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून गंभीर दखल

परभणीतल्या हिंसाचार प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश आयोगानं परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिले आहेत.   या प्रकरणी पोलिसांनी एकूण ८ गुन्ह्यांची नोंद केली असून, आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा पोलीस कोठडी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याचं वृत्त खोटं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बाजारपेठा सुरळीत सुरू ठेवाव...