December 18, 2024 7:24 PM December 18, 2024 7:24 PM
6
परभणी शहरात हिंसाचारप्रकरणी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी-धर्मपाल मेश्राम
परभणी शहरात हिंसाचारा दरम्यान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांना कोणत्याही FIR ची सक्ती न करता पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच या प्रकरणात ज्यांच्या विरोधात जनाक्रोश आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत अशा तीन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावं, असे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.