November 3, 2025 7:19 PM November 3, 2025 7:19 PM

views 81

राज्यातल्या स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला मंजुरी

राज्यातल्या अंगणवाड्यांचं आधुुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांंच रुपांतर अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाडीमधे केलं जाणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्हयातल्या बालकांना आनंददायी शिक्षणाचं वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे, असं बोर्...

July 12, 2025 7:53 PM July 12, 2025 7:53 PM

views 13

परभणीत हेमलिब्रा या इंजेक्शनचं लोकार्पण

हिमोफीलिया या आजारावरच्या हेमलिब्रा या इंजेक्शनचं लोकार्पण परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात झालं. हे इंजेक्शन उपलब्ध झालेलाय परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा आहे.   या आजाराच्या रुग्णांना आता उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जायची गरज पडणार नाही, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. बोर्डीकर यांनी हिमोफीलियाग्रस्त रुग्णांची, तसंच जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला भेटून त्यांची विचारपूस केली.

June 11, 2025 8:42 PM June 11, 2025 8:42 PM

views 11

परभणीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन

विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्यावतीनं परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यात आव्हाई इथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर पिकणाऱ्या नगदी पिकांविषयी शास्त्रज्ञांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाविषयी परभणीचे शेतकरी जळबाजी बुचाले यांनी अधिक माहिती दिली.   कृषी विभाग सांगली तसंच आत्मा प्रकल्प सांगली यांच्या संयुक्त प्रयत्नातून मिरज तालुक्यात शिपूर इथंही “कृषी संकल्प...

May 19, 2025 3:13 PM May 19, 2025 3:13 PM

views 20

परभणी शहरात अमली पदार्थांची नशा  करताना २१ जणांना अटक

परभणी शहरात कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध हुक्का पार्लरमधून अमली पदार्थांची नशा  करताना २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.   तिथून १ लाख २४ हजाराची रोख रक्कम आणि हुक्क्याचं  साहित्य पोलिसांनी  ताब्यात घेतलं असून कॅफे मालकासहित २१ ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.

March 21, 2025 7:05 PM March 21, 2025 7:05 PM

views 36

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं स्पष्ट

परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली. या प्रकरणातल्या विविध तक्रारींची सुनावणी काल आयोगासमोर झाली आणि आयोगानं मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, तसंच परभणीचे सीआयडी पोलीस उपअधीक्षक यांना नोटीस बजावली आणि अहवाल मागवले.   तसंच दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ज्या पोलिसांना सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार ...

March 19, 2025 7:48 PM March 19, 2025 7:48 PM

views 16

परभणी जिल्ह्यात १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ४ आरोपी अटक

परभणी जिल्ह्यात दैठणा इथं १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रूपयांचा मुददेमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने पत्रकाव्दारे दिली आहे.   घराचं बांधकाम करताना सापडलेलं सोनं स्वस्तात विकत देऊ असं सांगून ही फसवणूक करण्यात आली. माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 13

भारतीय कृषि व्यवस्था जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले.

January 10, 2025 7:40 PM January 10, 2025 7:40 PM

views 15

सराफा व्यापाराची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक

कर्नाटकातल्या सराफा व्यापाराची ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना परभणी स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   बेळगाव जिल्ह्यातल्या सराफा व्यापाऱ्याला सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत आरोपी त्याच्याकडून १० लाखांची रोकड घेऊन पसार झाले. पोलिसांनी आरोपींना कुंभारवाडी परिसरातून ताब्यात घेतले असून पुढचा तपास सुरू आहे.

December 30, 2024 7:54 PM December 30, 2024 7:54 PM

views 16

परभणीत संविधानाचा अवमान केला गेला – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी  चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.    यावेळी आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर वाकोडे यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत आणि घरातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  ...

December 20, 2024 2:44 PM December 20, 2024 2:44 PM

views 18

परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते. परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही. या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता, असंही त्यांनी नमूद केलं. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.   तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेल...