September 12, 2024 7:06 PM September 12, 2024 7:06 PM
14
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी भारतीय पथकासोबत प्रधानमंत्र्यांचा संवाद
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकासोबत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या प्रतिष्ठित स्पर्धेतल्या यशाबद्दल त्यांनी पदकविजेत्यांचं आणि सहभागी खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारतानं ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य अशी २९ पदकं मिळवून विक्रमी कामगिरी केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया हेही यावेळी उपस्थित होते.