September 1, 2024 3:33 PM
35
पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस
पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस आहे. उत्तम कामगिरी करून आज पदकतालिकेत भर घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रवी रंगोली, तर उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार आज मैदानात उतरतील. १० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या पात्रता फेरीत अवनी लेखराही खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे सुहास यथिराज आणि सुकांत कदम अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यांच्यापैकी कुणीही जिंकलं, तरी भारतासाठी एक पदक निश्चित झालं आहे. दरम्यान, काल रुबिना फ्रान्सिस हिनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्...