January 23, 2025 6:55 PM January 23, 2025 6:55 PM
2
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी, स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होते, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेताजींनी लाखो लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली, स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा त्यांचा अथक लढा आणि आझाद हिंद फौजेचं त्यांचं साहसी नेतृत्व येणाऱ्य...