March 11, 2025 9:46 AM March 11, 2025 9:46 AM

views 16

जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेला आजपासून सुरुवात

जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 स्पर्धा आज दुपारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरू होईल. तीन दिवसांच्या या स्पर्धेत 250 पॅरा-अ‍ॅथलीट्स सहभागी होतील, ज्यामध्ये 145 भारतीय आणि 20 देशांतील 105 आंतरराष्ट्रीय स्पर्धक असतील. ते 90 अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेतील. यंदाची ही स्पर्धा भारतानं आतापर्यंत आयोजित केलेली सर्वांत मोठी पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आहे.   भारतीय पथकाचे नेतृत्व पॅरिस 2024 पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमार, नवदीप सिंग आणि धरमबीर करतील. जागतिक पॅरा ...

September 13, 2024 12:15 PM September 13, 2024 12:15 PM

views 12

पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या पदकविजेत्या आणि इतर स्पर्धकांचं त्यांनी अभिनंदन केलं. या दिव्यांग खेळाडूंचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसाठीच एक मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले.  या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सुमित अंतिल यानं आपलं एक सुवर्ण पदक प्रधानमंत्र्यांना समर्पित केलं. तर प्रधानमंत्र्यांनी या स्पर्धेपूर्वी दिलेलं प्रोत्साहन आपण कधीच विसरू श...